Dhule News: उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका
संपूर्ण राज्यात आता हरभरा काढणी वेगाने सुरु झाली. हरभरा काढणी जसजशी पुढं सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात वाढत्या उष्णतेचा हा परिणाम असल्याची माहिती उत्पादकांकडून देण्यात आली आहे.
त्यामुळं यंदा राज्यातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील उत्पादकता यंदा 20 ते 25 टक्क्यांनी कमी राहणार आहे.
महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका बसतोय.
राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती
मागील काही दिवसांपासून दिवसा तापमान जास्त वाढतंय. त्यामुळं हरभरा उत्पादकता घट पुढे येत आहे. बाजाराचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील उत्पादतेकडे आहे.
राज्यात उत्पादकता कमी येत असल्यानं बाजारावर त्याचा परिणामही दिसत आहे.
सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी 4 हजार 600 ते पाच हजार रुपयांचा भाव मिळतोय.