'बम डिगी डिगी' फेम अभिनेत्रीचं कर्व्ही फिगर अन् ग्लॅमरस अदा, बिकिनी लूकने चाहते घायाळ
Sakshi Malik Bikini Photos : मित्रांच्या कहाणीवर आधारित 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांना आवडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातील 'बम डिगी डिगी' गाण्याने तरुणाईला भूरळ पाडली. या गाण्यामुळे अभिनेत्री साक्षी मलिक रातोरात प्रसिद्ध झाली.
साक्षी मलिक रिअल लाईफमध्येही खूप हॉट आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
साक्षी मलिक नेहमीच तिच्या सोशल मीडियावर बिकिनी लूकमधील तिचे फोटो शेअर करते आणि कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करते.
साक्षी मलिकचं इंस्टाग्राम अकाऊंट पाहिलं, तर तुम्हाला अंदाज येईल की, तिला फिरायला फार आवडतं. त्यातच बीच तिचं आवडतं डेस्टिनेशन आहे.
साक्षी मलिककडे बिकिनीचं चांगलं कलेक्शन आहे. बीच वेकेशनवेळीचे स्टायलिश बिकिनी आणि मोनोकिनी लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
साक्षी मलिकने इंस्टाग्रामवर समुद्र किनारी फिरतानाचे आणि बोटीवर सफर करतानाचे बिकिनी लूकमधील अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे चाहते घायाळ झाले असून तिच्या फोटोंवरुन नजर हटवणंही फार कठीण आहे.
साक्षी मलिक मूळची कानपूरची आहे. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. साक्षी मलिकचा जन्म 21 जानेवारी 1996 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला.
तिने दिल्लीतील जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून तंत्रज्ञानात पदवी (Bachelor of Technology) शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजमध्ये असताना, तिने फॅशन शोमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, साक्षी मलिक मुंबईत आली. यावेळी तिने नायका आणि पीसी ज्वेलर सारख्या ब्रँडच्या जाहिरातींसाठी मॉडेलिंग केलं.
2018 मध्ये आलेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातून साक्षी मलिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील 'बम डिगी डिगी' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. याशिवाय, ती अरमान मलिकच्या 'वेहम' या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली.