Bollywood Wedding : यामी गौतम ते नेहा धुपिया, या अभिनेत्रींनी केले साध्या पद्धतीने विवाह
बॉलिवूड स्टार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकांनी डोळ्याचं पारणं फिटेल असं भव्य-दिव्य पद्धतीने लग्न केलं. पण काही स्टार्स असे आहेत की त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरशी कुटुंबातील व्यक्तींच्या साक्षीने विवाह केला. हिमाचलमध्ये त्यांनी साध्या पद्धतीने विवाह केला.
अभिनेत्री नेहा धुपियाने लग्न केल्याची बातमी तिच्या सोशल मीडियातील फोटोमुळे मिळाली. नेहा आणि अंगद बेदी यांनी दिल्लीच्या एका गुरुद्वारामध्ये छोटेखानी पद्धतीने विवाह केला.
'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील अभिनेत्री एलविन शर्मा हिने ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या डेंटल सर्जन डॉ. तुषार भिंडी यांच्यासोबत विवाह केला. एलविनने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या लग्नाची माहिती समोर आली.
दिया मिर्झाच्या लग्न सोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती, कारण तो अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला होता.