Nusrat Jahan | तृणमूलच्या खासदार नुसरत जहां म्हणाल्या.. निखिल जैनबरोबर लग्न कधीच वैध नव्हतं!
तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत सांगितले आहे की निखिल जैन यांच्याशी तिचे लग्न कधीच वैध नव्हते. कारण, भारतात विशेष विवाह कायद्यांतर्गत वैवाहिक संबंध कायम असणे आवश्यक आहे. लग्न कायदेशीर, वैध आणि व्यवहार्य नव्हते म्हणून घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांचे 2019 मध्ये तुर्की येथे बिझनेसमॅन निखिल जैनसोबत लग्न झाले होते. नुसरतने स्वत: तिच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. पण आता हे लग्न मान्य नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.
वास्तविक, काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात दुरावल्याच्या बातम्या येत होत्या. निखिलने सांगितले की ते 6 महिन्यांपासून एकत्र नाही. या सर्वांच्या दरम्यान नुसरतच्या गरोदरपणाच्या बातमीनेही तर खळबळ माजली होती. निखिलने सांगितले की आपल्याला याची माहिती नाही आणि नुसरत जर गर्भवती असेल तर ते मूल त्यांचे नाही.
आता नुसरत जहां यांनी या विषयावर एक निवेदन जारी केले आहे- 'तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार परदेशी भूमीवर असल्याने हे लग्न अवैध आहे. तसेच, हे आंतरराष्ट्रीय धर्मविवाह (दोन धर्माच्या लोकांमधील विवाह) असल्यामुळे, याला भारतात कायदेशीर मान्यता देणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही.
'कायदेशीरदृष्ट्या हे लग्न वैध नाही. हे एक नाते किंवा लिव-इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही.
नुसरत म्हणाल्या की 'आम्ही फार पूर्वीपासून विभक्त झालो होतो. मात्र, मी याबद्दल बोलले नाही. कारण, मला माझे खाजगी आयुष्य स्वतःपुरते सीमित ठेवायचे होते. आमचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही.
नुसरत आणि निखिल यांच्यात तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निखिलनेही गुन्हा दाखल केला आहे. निखिल म्हणतो की नुसरतला माझ्याबरोबर नाही तर दुसर्याबरोबर राहायचे आहे.
त्यामुळे या नात्याचं पुढे काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (सर्व फोटो नुसरत जहां सोशलमीडिया)