PHOTO : Lara Dutta पूर्वी 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारल्या Indira Gandhi, ओळखणं कठिण
बेल बॅाटम या चित्रपटाचा ट्रेलर 3 ॲागस्ट रोजी रिलीज झाला. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील इंदिरा गांधींच्या लूकनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हापासूनच ही भूमिका साकरणारी अभिनेत्री नेमकी कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. बेल बॉटममध्ये अभिनेत्री लारा दत्तानं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरली आहे. पण यापूर्वीही अनेक चित्रपटांत भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिका अनेक अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर मोठ्या केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट विशेष गाजला. यामध्ये दिग्गद अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर चित्रपटात अभिनेत्री अवंतिका अकरकर यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. किशोरी शहाणे यांचाही लूक त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.
मराठी चित्रपट Yashwantrao Chavan : Bakhar Eka Vadalachi मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2017 मध्ये सुप्रिया विनोद यांनी दुसऱ्यांदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून आल्या होत्या. इंदू सरकार या चित्रपटात त्यांनी दुसऱ्यांदा इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
1975 मध्ये आलेला चित्रपट आंधी मध्ये सुचित्रा सेन यांनी एक राजकीय पात्र साकारलं होतं. त्यावेळी त्यांची व्यक्तिरेखा इंदिरा गांधी यांच्याशी मिळती जुळती असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे चित्रपटावर आक्षेपही घेण्यात आला होता.
दरम्यान, बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतनेही आपला आगामी चित्रपट इमरजंसीमध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणार आहे.