PHOTO : सेटवर भेटले आणि प्रेमात पडले...! या सेलिब्रिटी जोडप्यांच्या भन्नाट लव्हस्टोरी...
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरीमध्ये चाहत्यांना अधिक रस असतो. आज आम्ही आपल्याला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांचं प्रेम सेटवर जुळलं आणि ते जन्मोजन्मीचे सोबती झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहली-अनुष्का शर्मा: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची भेट एका शांपूच्या जाहिरात चित्रिकरणावेळी झाली. त्याचवेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर प्रेम वाढत गेलं आणि नंतर दोघांनी लग्न केलं.
सैफ अली खान-करीना कपूर: सैफ अली खान आणि करीना 2008 मध्ये आलेल्या टशन सिनेमाच्या चित्रिकरणावेळी एकत्र आले. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं.
अजय देवगण-काजोल: रिपोर्ट्सनुसार 1995 साली आलेल्या ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर अजय देवगण आणि काजोलची भेट झाली. तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये लग्न केलं.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यात‘गोलियों की रासलीला रामलीला’ शूटिंगवेळी जवळीकता वाढली. त्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं.