Raj Kapoor Affairs : लग्नानंतरही राज कपूर अनेक वेळा पडले होते प्रेमात, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही इंटरेस्टिंग किस्से!
भारतात जेव्हापासून बॉलिवूडला सुरुवात झाली तेव्हापासून अनेक कलाकारांची प्रेम प्रकरणं गाजली आहेत. यामध्ये काही कलाकारांची प्रेम प्रकरणं यशस्वी झाली, तर काहींना त्यांच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यात यश मिळालं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सुंदर अभिनेत्रींच्या प्रेमात पडल्याचे किस्से हे सुरुवातीपासून ऐकायला मिळत होते. आपल्या आवडत्या नायक आणि नायिकांच्या प्रेम प्रकरणांबद्दल लोकांनाही सुरुवातीपासून इंटरेस्ट होता. त्यामुळे त्याला तशी प्रसिद्धीही मिळत असत. आज आपण अशाच काही किस्स्यांबद्दल जाणून घेऊया...
बॉलिवूडचे शोमॅन राजकपूर यांच्या नावाचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांच्या खाजगी आयुष्यातील किस्स्यांचीही खूप चर्चा केली जाते.
या शोमॅनला फक्त 64 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्यांनी 2 जून 1988 रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र यानंतरही राज कपूर यांच्या प्रेमात पडलेल्या कहाण्यांची अनेक जण चर्चा करतात.
सिनेसृष्टीतील महान अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते पुत्र आहेत. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. त्यांना चित्रपटाचा वारसा आपल्या घरापासूनच लाभला होता. राज कपूर हे विवाहानंतरही अनेक वेळा प्रेमात पडल्याचे अनेक किस्से चवीने चर्चिले जातात. या किस्स्यांचा त्यांचे पुत्र ऋषी कपूर यांनी आपले आत्मचरित्र 'खुल्लम खुल्ला' या पुस्तकात केला होता.
आपल्या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे की, 'माझे बाबा राज कपूर जेव्हा 28 वर्षांचे होते त्यावेळी ते कोणावर तरी प्रचंड प्रेम करत होते.
ऋषी कपूर यांनी उल्लेख केल्यानुसार, राज कपूर यांची प्रेयसी दुसरी तिसरी कोणी नाही तर त्यावेळी सुपरहिट ठरलेल्या 'आग' (1948), 'बरसात' (1949) आणि 'आवारा' (1951) सिनेमातील अभिनेत्री होती. मात्र ऋषी कपूर यांनी कोणत्याही अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. परंतु ज्या सिनेमांच्या नावांच्या उल्लेख केला त्यांनी केला, 'त्या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री नर्गिस होत्या.
ऋषी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा माझ्या बाबांचं अफेअर वैजयंती मालासोबत होते, त्यावेळी मी माझ्या आईसोबत मरीन ड्राईव्ह येथील नटराज हॉटेलमध्ये राहत होतो. ऋषी कपूर पुढे असं लिहितात की, 'हॉटेलमधून आम्ही चित्रकूट येथील आमच्या घरी स्थायिक झालो होतो. त्यांनी आईला परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु जोपर्यंत वडिलांच्या आयुष्यातील त्या गोष्टीं संपत नाहीत तोपर्यंत आईने ते मान्य केलं नाही.'
अभिनेत्री नर्गिस आणि वैयजंती माला यांच्यानंतर राज कपूर यांचं नाव झीनत अमानसोबत जोडलं होतं. असं म्हटलं जातं की, 'सत्यम शिवम् सुंदरम्' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान राज कपूर आणि झीनत आमन यांच्यात जवळीक वाढली होती.