WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी कोहलीचा बिस्ट 'मोड ऑन'; टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु, इंग्लंडमधील फोटो समोर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे.
टीम इंडियाचा चॅम्पियनशीप फायनल आधी जोरदार सराव सुरु आहे.
विराट कोहलीनं इंग्लंडमधील सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये विराट कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे.
मागील दोन वर्षांमध्ये आठ संघामध्ये WTC साठी लढत सुरु होती. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडमध्ये 7 जून 2023 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.