PHOTO : परी म्हणू की सुंदरा... रिया चक्रवर्तीचा 'प्रिंसेस' लूक!
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही रियानं आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं सर्वांना वेड लावलं आहे. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरियानं काही दिवसांपूर्वी एका फॅशन विकमध्ये शो स्टॉपर होती. तिनं यावेळी ब्लॅक आउटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
रिया चक्रवर्तीचा नवा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. रियानं फोटो शेअर करताना लिहिलंय की, नव्या सुरुवातीसाठी. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. एका फॅननं रियाच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, रिया तू खूपच सुंदर दिसत आहेत. रियाला या लूकमध्ये पाहून चाहते खूपच आनंदी झाले आहेत. आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे की, तुला आनंदी पाहून, मीसुद्धा खूप आनंदी आहे. तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
रिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. रियाच्या ग्लॅमरस आणि क्लासी लूकवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
रिया इंडस्ट्रीमध्ये परत येण्यासोबतच आपल्या फिटनेसवरही काम करत आहे. ती नेहमीच आपल्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
रियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रियाला सर्वात शेवटी अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांच्यासोबत 'चेहरे' मध्ये दिसून आली होती. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)