In Pics : बॉलिवूडला मोहात पाडणारी 'ही' प्रसिद्ध ठिकाणं
बॉलिवूडचे अनेक चित्रपट असे आहेत की ज्यांची शूटिंग काही प्रसिद्ध ठिकाणी झाली आहेत. 'रंग दे बसंती' या चित्रपटात दिल्लीतील काही ठिकाणांना खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'जयपूरपासून 11 किमी लांब असलेल्या आमेरच्या किल्ल्यात 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं होतं.
बनारसचा घाट हा बॉलिवूडच्या चित्रिकरणासाठी दिग्दर्शकांचा आवडता घाट. या ठिकाणी रांझणा, पीकू आणि अनेक चित्रपटांचे शुटिंग झालं आहे.
पँगोंग स्तो झील हा तलाव लडाखमध्ये आहे. या ठिकाणी 'थ्री इडियट्स' या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आलं होतं. तसेच जब तक है जान, भाग मिल्खा भाग, दिल, लक्ष्य आणि अनेक चित्रपटांचं शूटिग या ठिकाणी करण्यात आलं आहे.
अथिराप्पिल्ली वॉटरफॉल हा केरळचा सर्वात मोठा धबधबा आहे. या ठिकाणी जगभरातील पर्यटक भेट देतात. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांचे या ठिकाणी शूटिंग झालं आहे.
'बर्फी' या चित्रपटाचं शूटिंग दार्जिलिंगमध्ये करण्यात आलं आहे.
साजन, राज, दिल, गोलमाल अगेन आणि अनेक चित्रपटांचे शूटिंग हे उटीमध्ये झालं आहे.
दिल्लीतील अनेक ठिकाणं ही बॉलिवूडकरांची आवडती ठिकाणं. या ठिकाणी अलिकडे मोठ्या प्रमाणात शुटिंग केलं जात आहे.