Katrina Kaif : शाळेचे कधी तोंड पाहिले नाही, आज आहे 263 कोटींची संपत्ती, सिनेइंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 रोजी ब्रिटिश हाँगकाँग मध्ये झाला. मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे असून ते ब्रिटिश व्यावसायिक आहेत. तर, तिची आई ब्रिटिस वकील आणि सामाजिक कार्यकर्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना लहान असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. कतरिनाला तिच्या आईने लहानाचे मोठे केले. कतरिनाची आई ही सामाजिक कार्यकर्ता असल्याने वेगवेगळ्या देशात स्थलांतरीत होत असे. त्यामुळे कतरिना आणि तिच्या बहिणीचे शाळेत शिक्षण झाले नाही. त्यांना शिकवण्यासाठी ट्युटर्स हे घरीच यायचे.
कतरिना कैफ भारतात येण्याआधी तीन वर्ष लंडनमध्ये राहत होती. वयाच्या 14 व्या वर्षी तिने हवाईमध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका ज्वेलरी प्रोडक्टसाठी मॉडेलिंग केले.
लंडन फॅशन वीकमध्ये कतरिना अनेकदा मॉडेल म्हणून दिसली. तिच्या फॅशन शोने लंडनस्थित चित्रपट निर्माते कैझाद गुस्ताद यांचे लक्ष वेधून घेतले, त्यांनी तिला अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, मधु सप्रे आणि पद्मा लक्ष्मीची भूमिका असलेल्या 'बूम' चित्रपटात कास्ट केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
कतरिना भारतात चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्यानंतर तिने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.
कतरिनाचा पहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर 2004 मध्ये मल्लिसवारी या तेलगू चित्रपटात ती दिसली. या चित्रपटासाठी कॅटला मोठं मानधन मिळाले होते.
यानंतर ती 'सरकार'मध्ये दिसली, पण बॉलिवूडमध्ये तिला पहिले यश 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाले. या चित्रपटात सलमान खान, सुष्मिता सेन आणि सोहेल खानसोबत कतरिना कैफ दिसली होती.
यानंतर कतरिना कैफचे नशीब चमकले. त्यानंतर तिने 'नमस्ते लंडन', 'अपने', 'पार्टनर', 'वेलकम', 'रेस', 'एक था टायगर', 'सिंग इज किंग', 'टायगर जिंदा है', 'जब तक है जान' असे अनेक हिट चित्रपट दिले.
आज कतरिना कैफ बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपटासाठी कतरिना 15 ते 21 कोटी रुपये मानधन आकारत असल्याचे वृत्त आहे. कतरिनाकडे अनेक ब्युटी ब्रँड्स आहेत आणि तिची एकूण संपत्ती 263 कोटी रुपये आहे.
कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले आहे.