1955 च्या कादंबरीवर 250 कोटींचा चित्रपट बनवला; 2022 मध्ये 500 कोटी छापले, IMDb रेटिंग 7.6
भारतीय फिल्म इंडस्ट्रीतच्या सुरुवातीला रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांवर चित्रपट बनवले गेलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या काळानुसार, निर्मात्यांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या आणि त्यांनी त्यांच्या काळातील लोकप्रिय आणि ट्रेंडिंग पुस्तकांवर आधारित कथा तयार केल्या.
आज आम्ही तुम्हाला 1955 मधल्या एका कादंबरीवर आधारित एका चित्रपटाबाबत सांगणार आहोत. कादंबरीप्रमाणेच जवळपास 55 वर्षांनी तयार करण्यात आलेला चित्रपट दोन पार्टमध्ये तयार करण्यात आला आहे.
फिल्म मेकर्सनी 500 कोटी रुपयांमध्ये मल्टीस्टारर चित्रपट तयार केला आहे. याआधीच्या पार्टनं बक्कळ गल्ला जमवला. कोणता आहे हा चित्रपट तुम्ही अंदाज बांधू शकता का?
सर्वात आधी जाणून घेऊयात, चित्रपचाबाबत. सप्टेंबर 2022 मध्ये आलेल्या या चित्रपटाचं नाव 'पोन्नियन सेल्वन 1' आहे. चित्रपट दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, म्युझिक एआर रहमान यांनी दिलेलं आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. चित्रपटाची आयएमडीबी रेटिंग 7.6 आहे.
'पोन्नियन सेल्वन 1' मध्ये चियान विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, सारा अर्जुन, त्रिशा, जयमरावि, शोभिता धुलीपाला, प्रकाश राज, आर.शरथकुमार आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाचा पहिला पार्ट 250 कोटींमध्ये बनवण्यात आला होता.
चोल साम्राज्यावर आधारित 'पोन्नियन सेल्वन' पॅन इंडिया फिल्म होती, ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपये कमावले होते. पहिल्या पार्टमध्ये चित्रपटानं दोन्ही चित्रपटांचं बजेट वसुल केलं. यानंतर तब्बल 7 एप्रिल 2023 मध्ये 'पोन्नियन सेल्वन 2' रिलीज करण्यात आला.
'पोन्नियन सेल्वन 2' बॉक्स ऑफिसवर 345 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. म्हणजेच, 500 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या दोन्ही चित्रपटांनी 845 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. चित्रपटाला प्रेक्षकांपासून क्रिटिक्सनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दुसऱ्या पार्टची आयएमडीबी रेटिंग 7.3 आहे.
'पोन्नियन सेल्वन 1 आणि 2' या नावाच्या कादंबरीवर आधारीत आहे. म्हणजेच, नॉवेलचं नावही 'पोन्नियन सेल्वन : फ्रेश फ्लड' आणि 'पोन्नियन सेल्वनः व्हर्लविंडस' होतं. या कादंबरीला तमिळमध्ये कल्कि कृष्णमूर्तिनं लिहिलं होतं, जी इंग्लिशमध्ये पवित्रा श्रिनिवासन यांनी अनुवादित केली होती.
'पोन्नियन सेल्वन 1' यांनी बेस्ट तमिळ फिल्म, बेस्ट सिनेमेटोग्राफी, बेस्ट म्यूजिक डायरेक्शन (बॅकग्राउंड स्कोर) आणि बेस्ट साउंड डिझाइनसाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड्स जिंकले होते. याव्यतिरिक्त अनेक कॅटेगरीमध्ये साऊथ फिल्मफेयर अवॉर्डसी आपल्या नावे केलेत.