केवळ 'सेक्टर 36' नाहीतर, 10 ते 13 सप्टेंबरमध्ये OTT वर येतायत 'या' 5 वेब सीरिज; सगळ्या एकापेक्षा एक वरचढ
या आठवड्यात म्हणजेच, 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत ओटीटीवर एकापेक्षा एक अशा वरचढ वेब सीरिज येणार आहेत. यापैकी काही सीरिजची वाट प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून पाहत आहेत. जाणून घेऊयात, 5 मोस्ट अवेटेड वेब सीरिजबाबत...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेक्टर 36: विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियाल स्टारर ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. असं सांगितलं जात आहे की, ही वेब सीरिज 2006 मध्ये नोएडामध्ये झालेल्या भयानक वास्तविक हत्यांपासून प्रेरित आहे. ही मालिका तुम्ही 13 सप्टेंबरपासून Netflix वर पाहू शकता. दरम्यान, ही मालिका नोएडा सेक्टर 36 मधील स्थानिक झोपडपट्टीतून अनेक मुलं अचानक बेपत्ता झाल्याची कथा सांगते.
एमिली इन पॅरिस सीझन 4 पार्ट 2 : या मालिकेचा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला असून त्याचा दुसरा भागही येणार आहे. या मालिकेचा दुसरा भाग तुम्ही नेटफ्लिक्सवर 12 सप्टेंबरपासून पाहू शकता. या रोमँटिक मालिकेत एमिलीला ती शोधत असलेलं प्रेम मिळतं. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.
द मनी गेम : लुइसियाना स्टेट युनिवर्सिटीवर आधारीत ही एक डॉक्यूमेंट्री आहे. ज्यामध्ये तुम्हाला 6 एपिसोड्स पाहायला मिळतील. या डॉक्युमेंट्री सीरीजमध्ये लुइसियाना स्टेट युनिवर्सिटीच्या एथलिटची कहाणी दाखवली गेली आहे. तुम्ही ही सीरिज 10 सप्टेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
बर्लिन: इश्वाक सिंह, अपारशक्ति खुराना आणि राहुल बोस स्टारर ही एक स्पाय-थ्रिलर फिल्म आहे. हा चित्रपट तुम्ही 12 सप्टेंबरपासून झी5 वर पाहू शकता. या चित्रपटाचं कथानक रशियाच्या राष्ट्रपतींच्या हत्येच्या कटाच्या आसपास फिरतं.
खलबली रिकॉर्ड्स: राम कपूर, स्कंद ठाकुर, सलोनी बत्रा, सलोनी पटेल आणि पंजाबी रॅपर प्रभा दीप स्टारर ही एक म्युझिक इंडस्ट्रीवर आधारित वेब सीरीज आहे. ही सीरिज तुम्ही 12 सप्टेंबरपासून जिओ सिनेमावर पाहू शकता. या सीरिजमध्ये रेखा भारद्वाज, अमित त्रिवेदी, नीति मोहन, अनु मलिक, शाहिद माल्या अभिजीत सावंत यांसारखे अनेक दिग्गज संगीतकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.