Rhea Chakraborty Struggle : सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या रियाच्या कमाईचा स्रोत काय? म्हणाली, मी काळी जादू....
रिया चक्रवर्तीने तिचे नवीन पॉडकास्ट 'चॅप्टर 2' लाँच केला. यामध्ये रियाने तिच्या आयुष्याबाबत काही गोष्टींचा उलगडा केला आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन ही रियाच्या शोची पहिली गेस्ट होती. रियाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आणि आयुष्य कसे बदलले, यावर भाष्य केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरियाने सांगितले की, त्या टप्प्यात खूप काही सहन करावे लागले.प्रत्येकजण ते जाणून घेण्याचा आव आणतो. पण प्रत्यक्षात काय झाले हे त्यालाही माहीत आहे.
आता, त्या टप्प्यातून बाहेर आल्यावर हा माझा पुनर्जन्म आहे, असे मला वाटत असल्याचे रियाने सांगितले. ज्यांनी माझ्या वाईट काळात साथ दिली, त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न असल्याचे रियाने सांगितले.
लोकांना अजूनही माझ्या आयुष्यात खूप रस असल्याचे रियाने यावेळी म्हटले. मी जर चित्रपटात दिसत नाही तर माझी कमाई कुठून करायची हे जाणून ते देखील उत्सुक असल्याचे रियाने म्हटले.
रियाने सांगितले की, काही लोक माझा तिरस्कार करायचे. मी 'काळी जादू' करते असेही काहींना वाटते. त्यामुळे काहींनी मला 'हडळ'चा ही टॅग लावला.
पण, दुसरीकडे अशी काही लोक आहेत, ज्यांनी मला धैर्यवान, कणखर, धाडसी असल्याचे म्हटले. त्यामुळे मला कोण काय बोलतंय याचा काही फरक पडत नसल्याचेही रियाने सांगितले.
आपल्या उत्पन्नाचा स्रोत सांगताना रिया म्हणाली, 'मी चित्रपटांपासून दूर असले तरी इतरही अनेक कामे करत आहे.
रिया चक्रवर्तीने सांगितले की, ती एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे आणि यातून चांगली कमाई देखील करत आहे.
पॉडकास्टचे नाव माझ्या आयुष्याशी प्रेरित असल्याचे रियाने सांगितले.