40 व्या वर्षी पहिलं लग्न अन् 2 वर्षातच मोडला संसार, आता खास व्यक्तीला डेट करतेय टॉप अभिनेत्री
Guess This 90s Top Actress : बॉलिवूड सेलिब्रिटींची अफेअर्स, लग्न आणि घटस्फोट यांच्या चर्चा कायमच पाहायला मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक सेलिब्रिटींची नावं त्यांच्या कोस्टारसोबत जोडली जातात. काही जण खरंच प्रेमात पडतात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतात.
90 च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रीबाबत आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. या अभिनेत्रीचं सौंदर्य आणि तिच्या निरागस हास्याने तरुणाईला वेड लावलं होतं.
अभिनेत्री मनीषा कोईराला ही 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिने दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे तिची पर्सनल लाईफही खूप चर्चेत राहिली.
मनीषा कोईरालाचा जन्म 1970 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला. तिने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यापैकी अनेक चित्रपट हिट ठरले. मनीषा अलिकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी मनीषाला विचारण्यात आलं की, तिला तिच्या आयुष्यात जोडीदाराची कमतरता जाणवते का? यावर उत्तर तिने दिलेल्या उत्तराने चाहत्यांना असं वाटत आहे की, कदाचित तिच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती आहे.
मनीषाने 2010 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी नेपाळी व्यावसायिक सम्राट दहल याच्याशी लग्न केलं.
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, लग्नाच्या अवघ्या दोन वर्षानंतर मनिषाला कर्करोगाचं निदान झाला आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
मनीषा यावेळी म्हणाली की, कोण म्हणालं की, माझ्याकडे कोणी नाही? हे बरोबर आणि चूक दोन्ही आहे, कारण मी माझे आयुष्य आणि स्वतःला खूप चांगले समजून घेतलं आहे. जर माझ्या आयुष्यात जोडीदार आला तर, मी त्याच्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.
जर माझा जोडीदार माझ्यासोबत राहू शकला तर मला खूप आनंद होईल. पण मी जे आयुष्य निर्माण केलं आहे, ते मला अजिबात बदलायचं नाही, असंही तिने सांगितलं आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मनीषाने हे वक्तव्य केलं आहे.
मनीषा कोईरालाने 1989 मध्ये 'फेरी भेटौला' या नेपाळी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने 2012 मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. यानंतर, कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर, त्याने 2015 मध्ये 'चेहरे' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. त्यानंतर त्याने 2023 मध्ये 'शहजादा' चित्रपटात काम केले. ती 'हीरामंडी' वेब सीरीजमध्ये दिसली होती.