Bollywood Actor In Pakistani Movies : पाकिस्तानी चित्रपटात झळकले आहेत 'हे' बॉलिवूडचे सेलेब्स ; पाहा यादी
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांनी 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खामोश पानी' चित्रपटाद्वारे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह अनेक पुरस्कार जिंकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान यानेही पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गॉडफादर' या पाकिस्तानी चित्रपटात तो झळकला होता. या चित्रपटात त्याने शाकीर खानची भूमिका साकारली होती.
दिवंगत अभिनेते ओम पुरी अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्ये दिसले. वर्ष 2016 मध्ये ॲक्टर इन लॉ या चित्रपटात दिसले होते. पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल त्यांच्यावर नेहमीच टीका करण्यात येत होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला.
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी लोकप्रिय हॉलिवूड चित्रपट 'गॉडफादर: द लिजेंड कंटिन्यूज'च्या रिमेकद्वारे पाकिस्तानी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि हृदय शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली होती.
भारतीय अभिनेत्री ऋषिता भट्टने विनोद खन्ना आणि इतर भारतीय कलाकारांसोबत 'गॉडफादर: द लिजेंड कंटिन्यूज' या पाकिस्तानी चित्रपटात काम केले.
नेहा धुपियाने 'कभी प्यार ना करना' या चित्रपटातून आयटम नंबरद्वारे पाकिस्तानी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार वीणा मलिक, मोअम्मर राणा आणि झारा शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'खुदा के लिए'मध्ये नसिरुद्दीन शाह हे फवाद खान, इमान अली आणि शान शाहिदसोबत दिसले होते.
2013 मध्ये नसिरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी चित्रपट 'जिंदा भाग'मध्ये आमना इलियास आणि खुर्रम पात्राससोबत स्क्रीन शेअर केली होती.
'बिग बॉस 4' ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीने पाकिस्तानी ॲक्शन रोमान्स चित्रपट 'सल्तनत'मध्ये काम केले होते. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता.