बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर, पण साऊथमध्ये सुपरफ्लॉप ठरला 'हा' खलनायक; मेकर्सचे 350 कोटी पाण्यात, प्रेक्षकांनी फिरवली पाठ
350 कोटी रुपयांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट एवढा जोरदार बॉक्स ऑफिसवर आपटला आणि फ्लॉप झाला. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, त्याचं नाव बॉबी देओल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉबी देओल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. 2023 मध्ये बॉबी देओलनं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केलं. तो रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटात दिसला होता. चित्रपटात त्याची एन्ट्री क्लायमॅक्सच्या काही वेळापूर्वी होते, पण त्यानं त्याच्या फक्त आणि फक्त 10 मिनिटांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. (Image Credit: IMDb)
रणबीर कपूरच्या चित्रपटासाठी बॉबी देओलनं आपल्या बॉडीवर खूप काम केलं. त्याची टोन्ड बॉडी सर्वांना भावली आणि कधी नव्हे ते त्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या चित्रपटातल्या बॉबी देओलच्या लूकचीही खूप चर्चा झाली. त्यानं मोठ्या पडद्यावर खलनायक इतका भारी खुलवला की, लोक त्याचे चाहते झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला. 'अॅनिमल' हा बॉबी देओलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. (Image Credit: IMDb)
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या 'अॅनिमल' चित्रपटानं देशभरात 556.36 कोटी रुपयांची कमाई केली. जगभरात चित्रपटाची एकूण कमाई 917.82 कोटी रुपये होती. हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला होता. (Image Credit: IMDb)
त्यानंतर बॉबी देओल बिग बजेट साऊथ फिल्ममध्ये दिसला. या चित्रपटात बॉबी देओलनं सुपरस्टार सूर्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. बॉबी देओलच्या 'कांगुआ' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तमिळ भाषेत बनलेला हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये मुख्य भूमिकेत सुपरस्टार सूर्या होता. तर, खलनायकाची भूमिका बॉबी देओलनं साकारली होती. जेव्हा चित्रपटातला त्याचा पहिला लूक समोर आला, तेव्हा चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. 'कांगुआ'नं बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडेल. (Image Credit: IMDb)
बॉबी देओलचा 'कांगुआ' हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी खूप मोठा खर्च केला होता. पण कमाई तर सोडाच, चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याचं भांडवलंही वसूल करू शकला नाही. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकली नाही. (Image Credit: IMDb)
सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुआ' हा चित्रपट 350 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. ट्रेड वेबसाईट सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं देशभरात सर्व भाषांमध्ये 70.02 कोटी रुपये कमावले. तसेच, जगभरात चित्रपटाचं एकूण कलेक्शन 106.25 कोटी रुपये होतं. (Image Credit: IMDb)