Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pawan Kalyan Birthday Spl : चे ग्वेराचे फॅन अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण यांच्याबद्दल या गोष्टी माहिती आहे का?
चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी पवन कल्याण यांचा आज वाढदिवस आहे. ते आज 50 वर्षांचे झाले. त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 1996 मध्ये, जेव्हा पवन कल्याणने अक्काडा अम्मई इक्कडा अब्बाई या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, तेव्हा त्याला मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ म्हणून ओळखले गेले. पण थोड्याच वेळात त्याने आपली विश्वासार्हता निर्माण केली आणि तेलुगू भाषिक प्रेक्षकांमध्ये आपली शैली, स्वॅग आणि रीतिवादाने आपले स्थान निर्माण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दशकांच्या रोलर-कोस्टर कारकीर्दीत पवनने 30 च्या जवळपास चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका केली. यासह, त्याने दिग्दर्शक, निर्माता, स्टंट कॉर्डिनेटर, पार्श्वगायक, नृत्यदिग्दर्शक आणि कथा-स्क्रीन प्ले लेखक म्हणूनही काम केले. पवन त्याच्या स्पष्टवक्तेपणा, अद्वितीय शैली, दमदार अभिनय आणि मजेदार नृत्याच्या स्टाईलासाठी ओळखला जातो.
फार कमी लोकांना माहित आहे की त्याचे मूळ नाव कोनीडेला कल्याण बाबू आहे. एका मार्शल आर्ट इव्हेंटमध्ये त्याने स्वतःचे नाव पवन ठेवले, जे त्याला आवडले. नंतर त्याने तेच नाव ठेवले. त्यांची आवड बागकाम, राजकारण आणि दिग्दर्शनात होती. मात्र, चिरंजीवींची पत्नी सुरेखा यांनी त्यांना अभिनेता होण्यासाठी प्रोत्साहित केले.
पवन कल्याण एक प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट असून कराटेमध्ये ब्लॅक-बेल्ट आहे. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी स्टंट-कॉर्डीनेटर म्हणूनही काम केले आहे. पवन कल्याण हे कोका-कोला ब्रँडलाची जाहिरात करणाऱ्या सुरुवातीच्या दक्षिण कलाकारांपैकी एक होते. पण यानंतर त्यांनी कोट्यवधी रुपयांची ऑफर येऊनही कोणत्याही ब्रँडची जाहिरात केली नाही.
पवन कल्याणने कबूल केले की महान जपानी दिग्दर्शक अकीरा कुरोसावा यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. या प्रभावशाली चित्रपट निर्मात्याच्या नावावर त्यांनी आपल्या मुलाचे नावही ठेवले.
यासह, ते क्रांतिकारी नेते चे ग्वेरा यांचे कट्टर प्रशंसक आहेत. पवनच्या म्हणण्यानुसार, नेल्लोरमध्ये मध्यंतरीच्या दिवसांमध्ये त्यांनी चे ग्वेरा यांच्या जीवनाबद्दल वाचले, ज्यांचा प्रभाव त्यांच्या आयुष्यात राहिला.
गूगलच्या मते, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पवन कल्याण हा सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटी राजकारणी होता.