Sidharth Shukla : 'बाबुल का आंगन छूटे ना' ते 'बिग बॉस 13' चा विजेता; सिद्धार्थ शुक्लाची कारकीर्द
प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज मुंबईत निधन झालं. तो 40 वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूमुळं मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थनं अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. तो बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेतो होता. पाहूयात सिद्धार्थचा आतापर्यंतचा प्रवास...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2008 मध्ये सिद्धार्थनं 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून मालिका विश्वात पदार्पण केलं.
त्यानंतर 'जाने पहचाने से..ये अजनबी' मध्ये तो दिसून आला.
सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधू या मालिकेतून मिळाली.
'झलक दिखला जा सीझन 6' मध्येही तो दिसून आला होता.
'फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी सीझन 7' मध्येही सहभागी झाला होता.
सिद्धार्थ शेवटचा 'दिल से दिल तक' मध्ये दिसून आला होता.
सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस-13' चा विजेता होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ 'बिग बॉस ओटीटी' च्या सेटवर दिसून आला होता.