Sidharth Shukla : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट; वयाच्या 40व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Continues below advertisement
Feature_Photo_6
Continues below advertisement
1/9
बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
2/9
मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
3/9
मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
4/9
मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
5/9
बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
Continues below advertisement
6/9
सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
7/9
दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (PHOTO : @realsidharthshukla/IG)
8/9
(PHOTO : @realsidharthshukla/IG)
9/9
(PHOTO : @realsidharthshukla/IG)
Published at : 02 Sep 2021 01:13 PM (IST)