Bigg Boss OTT House : बिग बॉसच्या स्पर्धकांचा आशियाना; पाहा Inside Photos
Bigg Boss OTT House : बिग बॉस ओटीटी आज म्हणजेच, 8 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या शोमध्ये सर्वांना खूप काही वेगळं आणि खास पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. पण सर्वांचा लाडका भाईजान सलमान खान हा शो होस्ट करणार नाही. तर बिग बॉस ओटीटी निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहर हा शो होस्ट करणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा घराचं लूक काहीसा वेगळा आहे. याला ओटीटीच्या अुषंगानं डिझाईन करण्यात आलं आहे. घरात जागो-जागी कॅमेरे लावण्यात आले आहेत. गार्डन एरिया सुंदर लाईट्सनी सजवण्यात आला आहेत.
याच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक मोठी सी व्हाइट चेअर लावण्यात आली आहे. ज्यामुळे शाही लूक येतोय. यासोबतच ब्लू सोफाही ठेवण्यात आला आहे. भिंतीवर युनिक पेटिंगही करण्यात आली आहे.
घरातील बाथरुम एरिया कलरफुल पद्धतीनं सजवण्यात आला आहे. यामध्ये प्रिंटेड पडदे लावण्यात आले आहेत. सोफ्यांवर व्हाइट प्रिंटचे कव्हर लावण्यात आले आहेत.
घरातील किचनही सुंदर दिसत आहे. इथे प्लॅटफॉर्मवर झाडंही ठेवण्यात आली आहेत. याच्या दुसरीकडे बसण्यासाठी पिवळ्या रंगाच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.
यंदा घरातील लिविंग एरिया देखील वेगळा दिसत आहे. जिथे दर आठवड्यात कंटेस्टंटला करण जोहरचा सामना करावा लागू शकतो.