अनुष्का शर्मापासून दीपिका पादुकोणपर्यंत या 6 अभिनेत्रींचा ग्रीन साडीमधील रॉयल लूक

Kriti Sanon- जर आपल्याला साडीमध्ये स्टायलीश दिसायचं असेल तर तुम्ही क्रिती सेननकडून प्रेरणा घेऊ शकता. पारंपारिक ब्लाउजऐवजी क्रितीने लांब हिरव्या रंगाची हिरवी सूती साडी कुर्त्याप्रमाणे नेसली केली. पांढर्या स्नीकर्सनी क्रितीची कंफर्टेबल लूक पूर्ण केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Kareena Kapoor Khan- एथनिक आउटफिटमध्ये बेबो फारच सुंदर दिसते. या हिरव्या रंगाच्या रेशमी साडीसह करिनाने पन्नाचा हार घातला आहे. यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडलीय. सोबतच करीनाने आपल्या केसांना हलके कर्ल केले आहेत.

Alia Bhatt- ग्रीन सब्यसाची रफल साडी स्टाईललेस ब्लाऊज आणि डिझाइनर बेल्टसह आलिया भट्टने स्टाईल केली होती. तिने आपला लूक लॉन्ग इयररिंग्स आणि स्लीक केसांनी पूर्ण केला.
Deepika Padukone- दीपिका पादुकोणने अनेकदा आपले साड्यांवरील प्रेम व्यक्त केले आहे. सिल्क ग्रीन कलरच्या साडीमध्ये दीपिका एकदम रॉयल लूक देत आहे. तिने हे लीफ ग्रीन फुल स्लीव्ह ब्लाउजसह स्टाईल केले आहे.
Shilpa Shetty- साड्यांची शौकीन शिल्पा शेट्टीने एमरॉल्ड ग्रीन रफल्ड साडी निवडली. जी तिने शिमरी ब्लाउजसह स्टाईल केली होती. शिल्पाची ही शैली कोणत्याही कॉकटेल नाईटसाठी परिपूर्ण आहे.
Anushka Sharma- डिझायनर सब्यसाचीच्या टिश्यू ग्रीन साडीमध्ये अनुष्का शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. या अभिनेत्रीने आपल्या केसांना स्लीक बन बनवून स्टाईल केले आहे. साध्या सोन्याच्या हाराने दीपिकाचा लुक पूर्ण केला.