PHOTO | आलिया भट्टने हे 6 शरारा सूट परिधान करून जिंकली चाहत्यांनी मने

सब्यसाचीच्या या डिझायनर वेषभूषेत आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे. यात तिने सोन्याचे कानातले, कमीतकमी मेकअप आणि एक स्लीक पोनीटेलसह स्टाईल केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जयपूरमध्ये तिच्या मित्राच्या लग्नासाठी आलिया भट्टने पांढर्या शरारा सूटची निवड केली होती. कोणत्याही फंक्शनसाठी आपण असा पेहराव निवडू शकता. या सूटसह आलियाने नो मेकअप लुकचा अवलंबला आहे.

डिझायनर अनिता डोंगराने सेट केलेला हा शरारा आलिया भट्टने कलंक या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परिधान केला होता. कानातले आणि कर्ली केसांसोबत ही अभिनेत्री उठून दिसत होती.
उन्हाळ्यात होणाऱ्या लग्नांसाठी तुम्ही आलिया भट्टच्या या सनशाइन येलो रंगाच्या लुकमध्ये सर्वांनाच आकर्षित कराल. आलियाने ब्रेडेड हेयरस्टाईल आणि ग्लोय मेकअपने पेअर केलं होतं.
आलियाचा हा राणी कलर शरारा सूट कोणाचंही मन जिंकेल असाच आहे. जो तिने पारंपारिक दागिन्यांनी स्टाईल केला आहे. स्लीक केस आणि सॉफ्ट मेकअपने आलियाचा लुक पूर्ण केला आहे.
मागील काही वर्षात आलिया भट्टने तिच्या चाहत्यांना बरेच चांगले लूक दिले आहेत. पण तिचा कुर्ता, शरारा कॉम्बो अगदी वेगळा आहे. आलियाने एक साधा सूटही अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी केला आहे.
फोटो सौजन्य : आलिया भट्ट सोशल मीडिया