Anil Kapoor Gulshan Grover : 'राम लखन'च्या सेटवर अनिल कपूरचा गुलशन ग्रोव्हरसोबत झाला होता राडा; काय झालं होतं नेमकं?

वर्ष 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'राम लखन' सुपरहिट झाला होता.या चित्रपटात लखनच्या भूमिकेत अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर हा खलनायकाच्या भूमिकेत होता. जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, अमरीश पुरी, राखी , अनुपम खेर, सतीश कौशिक, रझा मुराद आदींसह तगडी स्टारकास्ट होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्याच वर्षी रिलीज झालेल्या सलमान खानच्या मैंने प्यार किया या चित्रपटानंतर त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्या मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले होते.
सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अनेक सीन्सवर प्रेक्षकांच्या टाळ्या पडल्या आहेत.
अशाच एका सीनच्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात भांडणे झाली. दोघांमध्ये बाचाबाची इतकी झाली की इतरांना हस्तक्षेप करून दोघांना वेगळं करावं लागले.
या भांडणामुळे अनेक वर्ष हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते, दोघांनी एकत्र कामही केले नव्हते.
अनेक वर्ष त्यांनी एकत्र काम केले नाही. अखेर निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर याने दोघांमध्ये समेट घडवून आणली.