Railway Station : रेल्वे स्थानकाला हिंदीत काय म्हणतात? बोलता-बोलता बोबडी वळेल
Railway Station Interesting Facts : भारतात रेल्वेचं जाळं देशभरात पसरलेलं आहे. देशात आठ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वे कोट्यवधी जनसामान्यांची जीवनवाहिनी आहे.
जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी भारतीय रेल्वेचा चौथा क्रमांक लागतो.
भारतात प्रत्येक शहर एकमेकांना रेल्वेने जोडले गेले आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचण्याचा हा एक मुख्य स्रोत आहे.
तुम्हीही ट्रेनने नक्कीच प्रवास केला असेल, त्यासाठी तुम्ही रेल्वे स्थानकावरही नक्कीच गेला असाल, पण रेल्वे स्थानकाला हिंदीमध्ये काय म्हणतात, हे तुम्हाला माहित आहे का?
आपण प्रामुख्याने बोलताना रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशन हा शब्द वापरतो.
आपण बोली भाषेत अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. ज्यामुळे आपल्याला मूळ शब्द माहित नसतात.
असाच एक शब्द म्हणजे रेल्वे स्टेशन. आपण रेल्वे स्टेशन हा शब्द बोलतो, ऐकतो आणि वाचतोही, पण त्याला हिंदीत काय म्हणतात ते आपल्याला माहित नाही.
यामुळेच, रेल्वे स्टेशन हाच खरा हिंदी शब्द आहे, असं अनेकांनी गृहीत धरलं आहे, पण तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
रेल्वे स्टेशनला हिंदीत ‘लौह पथ गामिनी विराम बिंदू’ किंवा ‘लौह पथ गामिनी विश्राम स्थल’ असं म्हणतात. हे नाव इतकं लांबलचक आहे की, लोकांना इंग्रजीत रेल्वे स्टेशन म्हणायला आवडतं.
रेल्वे स्टेशनला 'रेलगाडी पडाव स्थल' असेही म्हणतात.