Anant Radhika Haldi Ceremony: अनंत-राधिकाच्या हळदीत बॉलिवूड सेलेब्सची मांदियाळी, भाईजान ते रणवीरने लावली हजेरी...

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खाननेही हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलमान खानने यल्लो कलरचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी सलमानने पॅप्सला फोटोसाठी दिल्या.

रणवीर सिंगही राधिकाच्या हळदी फंक्शनमधून बाहेर पडताना दिसला. रणवीर सिंगनेही खास कार्यक्रमासाठी पिवळा कुर्ता परिधान केला होता.
यावेळी रणवीर सिंग पूर्णपणे हळदीने माखलेला दिसला. स्थळ सोडण्यापूर्वी अभिनेत्याने हस्तांदोलन केले आणि पॅप्सला अभिवादन केले.
या सोहळ्याला अभिनेत्री मानुषी छिल्लरही उपस्थित होती. यादरम्यान, मानुषीने स्लीव्हलेस ब्लाउजसह पिवळ्या रंगाचा भारी लेहेंगा परिधान केला होता. अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले होते आणि ग्लॉसी मेकअप केला होता. मानुषी इंडियन अटायरमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
राधिकाच्या हळदी फंक्शनमध्ये सारा अली खानने लक्ष वेधून घेतले. साराने मल्टीकलर लहंगा परिधान केला होता. सोबत हेव्ही ज्वेलरी वेअर केली होती. ग्लॅम मेकअपमध्ये सुंदर दिसत होती.
बॉलीवूड स्टार मुलांची आवडता ओरी देखील अनंत-राधिकाच्या हळदी कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी ओरीने पिस्ता हिरव्या रंगाच्या कुर्त्यावर निळ्या रंगाचे जाकीट परिधान केला होता.
या हळदी कार्यक्रमात गायक राहुल वैद्यने त्याची अभिनेत्री पत्नी दिशा परमारसोबत पोहोचला होता. राहुल लाल रंगाच्या सूटमध्ये चांगला दिसत होता, तर दिशाही गुलाबी रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत होती. या जोडप्याने पॅप्ससाठी जोरदार पोझ देखील दिली.
साराच नाही तर अनन्या पांडेनेही राधिकाच्या हळदी समारंभात हजेरी लावली होती. अनन्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अनन्याने ज्वेलरी परिधान करून आपला लूक पूर्ण केला.
अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात जान्हवी कपूर यल्लो कलरची साडी परिधान करून पोहोचली होती. जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले होते. जान्हवी या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
अर्जुन कपूरनेही अनंत-राधिकाच्या हळदी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अर्जुन मरून कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरचा पायजमा परिधान केला होता.