जॅकलिन फर्नांडिजपासून आलिया भट्टपर्यंत, बी-टाउन अभिनेत्रींचा मिक्स-अँड मॅच आउटफिट लूक पाहिलात का?

Deepika Padukone- दीपिकाने नेहमीच तिच्या मोनोक्रोम लूकने चाहत्यांना प्रभावित केलंय. पण आता तिच्या मिक्स-अँड मॅच आउटफिटमुळे या अभिनेत्रीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या गुलाबी रंगाच्या ऑफ-शोल्डर रफल डिटेल टॉपसह लाल पॅन्ट परिधान केली आहे. दीपिकाने या आउटफिटला मोत्याचे झुमके आणि फुशिया हील्सने अॅक्सेसराइझ केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Kriti Sanon- क्रिती सॅनॉनने मिक्स अँड मॅचच्या ट्रेंडमध्ये स्ट्रीट स्टाईल स्वीकारलेली दिसतेय. क्रितीने प्रिंटेड ग्रे जॉगर्ससह एक मॉडिश ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा घातलीय. हाय-सोल व्हाइट स्नीकर्ससोबत याची जोडी लावलीय.

Sara Ali Khan - सारा अली खानने व्हाइट कटआउट स्लीव्हलेस बॉडीसूटसह पेस्टल टाय-डाय प्रिंट केलेली जॉगर पँट घातली आहे. तिने लूप्ड पोनीटेलमध्ये आपले केस स्टाईल केले तसेच पेस्टल टोन्ड पंप्ससोबत तिच्या पोशाखांना एक नवीन लुक दिला.
Jacqueline Fernandez- जॅकलिन बर्याचदा मिक्स अँड मॅच आउटफिट परिधान करताना दिसते. तिला ब्लॅक अँड व्हाईट टॉपसह एकत्रित केलेल्या पिवळ्या रंगाच्या मिनी स्कर्टमध्ये पाहिले. जॅकलिनने व्हाइट पंप आणि स्टेटमेंट गोल्ड इयररिंगसह हा स्मार्ट-कॅज्युअल लुक केलाय.
Alia Bhatt - आलिया प्रत्येक आउटफिटमध्ये फ्रेश दिसते. या रेड फ्लेयर्ड पँटसोबत वरती क्रॉप टॉप घालून फ्लेयर्ड स्लीव्हसह ग्राफिक प्रिंट केलेल्या ब्लेझरमध्ये आलिया अप्रतिम दिसत आहे.