Alia Bhatt Photos : पांढरी साडी, गोल्डन नक्षी; गंगूबाईच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक
Alia Bhatt in White Saree : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) चा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) सध्या चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट (Alia Bhatt White Saree) क्लासी साडी लूक ट्राय करताना दिसत आहे. तिनं प्रमोशनसाठी व्हाइट कलर फिक्स केला आहे. आलियाचा व्हाइट साडी लूक सर्वांच्याच पसंतीस पडताना दिसत आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
आलियानं आज पुन्हा व्हाइट साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत. गोल्डन कलरची बॉर्डर आणि पिवळ्या रंगाची फुलं काढण्यात आली आहेत. तिनं हा फोटो शेअर करत व्हाइट हार्ट आणि चंद्राचा इमोजी पोस्ट केला आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
आलियानं या लूकमध्ये केस मोकळे सोडले आहेत. तसेच सिंपल मेकअप कॅरी केला आहे. त्यासोबतच तिनं कानात झुमके घातले आहेत. पांढऱ्या साडीतील तिचा अंदाज क्लासी दिसत आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
आलिया गंगूबाई काठियावाडीचं प्रमोशनसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिनं केसात गुलाबाची फुलं माळली आहेत. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
आलिया व्हाइट साडी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेअर करत आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण (Ajay Devgn) आणि विजय राज (Vijay Raaz) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)