Pushpa च्या 'श्रीवल्ली'चा भन्नाट किस्सा; रश्मिकाला वाटते 'या' अभिनेत्याची भीती!
Rashmika Mandanna
1/7
साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले दिसून आले आहेत. (photo:rashmika_mandanna/ig)
2/7
रश्मिका आणि विजय यांचा 'गीता गोविंदम' आणि 'डीअर कॉम्रेड' हे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. या जोडीने देशभरात धुमाकूळ घातला आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
3/7
पण एक वेळ अशी आली होती की रश्मिकाला विजय देवरकोंडाची भीती वाटत होती. हा किस्सा रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितला आहे. (photo:/thedeverakonda/ig)
4/7
रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती विजय देवरकोंडासोबत 'गीता गोविंदम' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा ती त्याला खूप घाबरत होती. आपण ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो त्या व्यक्तीला घाबरतो असं तीने सांगितलं. पण 'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी त्यांची वारंवार भेट झाली आणि त्यांची ओळख वाढत गेली. (photo:rashmika_mandanna/ig)
5/7
रश्मिकाने असंही सांगितलं की, विजय देवरकोंडा हा स्वभावाने अत्यंत शांत व्यक्ती आहे. त्याला सह-कलाकारांसोबत काम करणे खूप सोपे जाते. 'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करणे त्यामुळे खूप सोपे गेले. कारण तोपर्यंत त्या दोघांची ओळख निर्माण झाली होती. (photo:rashmika_mandanna/ig)
6/7
'डियर कॉम्रेड' चित्रपटात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची जबरदस्त केमिस्ट्री पडद्यावर पहायला मिळाली होती. (photo:rashmika_mandanna/ig)
7/7
रश्मिकाला 'डीअर कॉम्रेड' या सिनेमामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने रश्मिका मंदाना ही ‘पॅन इंडिया’ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
Published at : 11 Feb 2022 11:10 AM (IST)