अभिनेता अक्षय कुमार 56 व्या वर्षी पुन्हा होणार बाप, ट्विंकल खन्नाला प्रेग्नेंसीची चिंता
अलीकडेच ट्विंकलने एक विचित्र पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विंकलच्या या पोस्टमुळे वयाच्या पन्नाशीत अक्षय-ट्विंकल आई-बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
50 वर्षांच्या ट्विंकल खन्नाला ती गर्भवती असल्याची भीती वाटत आहे.
नुकताच ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच घाबरलेली आणि चिंतेत दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या हातात चहाचा कप दिसत आणि ती गोंधळलेली दिसत आहे.
ट्विंकल खन्ना पीरीयड्स मिस झाल्यामुळे चिंतेत असून ती गर्भवती असल्याची भीती सतावत आहे.
ट्विंकल विचारात आही की, तिची मासिक पाळी का चुकली? एकतर ती गर्भवती आहेत किंवा तिने मेनोपॉजच्या टप्प्यात प्रवेश केला असून त्यामुळे तिची मासिक पाळी चुकली आहे. या गोंधळात ही सापडली आहे.
ट्विंकलने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे, मी 50 वर्षांची झाली आहे, पण मला भीती वाटत आहे. मी पेरीमेनोपॉज (Perimenopause) क्लबमध्ये सामील झाली आहे का?
तिने पुढे लिहिलंय की, तुम्ही लोक तुमचा रजोनिवृत्तीचा (Perimenopause) अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकता.
तुमची मासिक पाळी चुकल्यावर मला जसं वाटतं तसं तुम्हालाही वाटले होते का? हे तुम्ही सांगू शकता, असं ट्विंकलने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती एक लेखिकाही आहे. ट्विंकल आणि अक्षयला आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत.