बम्पर रिटर्न्स देणारे स्टॉक्स हवे आहेत? ही घ्या यादी; मिळवा बक्कळ पैसे!
Axis Direct top 5 Positional Pick: केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्याआधी कोणते शेअर्स खरेदी करावेत असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ॲक्सिस डायरेक्ट (Axis Direct) या ट्रेडिंग सुविधा देणाऱ्या आस्थापनेने काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर 5 ते 15 दिवसांचा विचार करून सांगण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ॲक्सिस डायरेक्टने हे शेअर्स खरेदी करताना स्टॉप लॉल काय असावा, टार्गेट किती असावे, याबाबतही सुचवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appॲक्सिस डायरेक्टने सुचवलेल्या शेअर्समध्ये Castrol India, Navin Fluorine International, Avanti Feeds, TeamLease Services, LIC Housing Finance या शेअर्सचा समावेश आहे.
Axis Direct ने TeamLease Services हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून 3,150 रुपयांचे टार्गेट तर 2,840 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर खरेदी करताना एन्ट्री प्राईज रेंज 2,880 - 2,910 रुपये सूचवण्यात आलीय.
ॲक्सिस डायरेक्टने Castrol India या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टारगेट 279 रुपये तर स्टॉप लॉस 248 रुपये ठेवावे असे ॲक्सिस डायरेक्टने म्हटल आहे. या शेअरसाठी एन्ट्री प्राईज रेंज 251.50 - 254.65 ररुपये आहे.
Axis Direct ने Navin Fluorine International हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. टार्गेट 3,935 तर स्टॉप लॉस 3,555 रुपये ठेवायला हवा. या शेअरसाठी एन्ट्री प्राईज रेंज 3,614.00 - 3,650 रुपये असावी, असे ॲक्सिस डायरेक्टने सुचवले आहे.
ॲक्सिस डायरेक्टने Avanti Feeds हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. टार्गेट 710 रुपये तर स्टॉप लॉस 606 रुपये ठेवायला हवा. या शेअरसाठी एन्ट्री प्राईज रेंज 626 - 632 रुपये असावी, असे ॲक्सिस डायरेक्टने म्हटले आहे.
ॲक्सिस डायरेक्ट या ब्रोकिंग फर्मने LIC Housing Finance हा शेअरही खरेदी करावा असे सांगितले आहे. त्यासाठी 879 रपयांचे टार्गेट तर 774 रुपयांचा स्टॉप लॉस असावा, असे ॲक्सिस डायरेक्टचे मत आहे. या शेअरसाठी एन्ट्री प्राईज रेंज 781 - 789 रुपये आहे.
image 8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)