Guru purnima 2024 : स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी पाहिलात का? अक्कलकोटमध्ये स्वामींच्या पादुका दर्शनासाठी गर्दी
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचे दर्शन.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी आणि त्यांच्या पादुका प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आज गुरुपूर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी आणि त्यांच्या पादुकांचं दर्शन देण्यात आलं.
सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सूर्यमणी आणि पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.
या सूर्यमणी आणि पादुका दर्शनासाठी अक्कलकोट येथील जुना राजवाडा परिसरातील गणेश पंचायतन मंदिरात दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.
स्वामी समर्थ आणि मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट गणेश पंचायतन मंदिरात झाली होती.
त्या वेळी स्वामींनी गुरुप्रतिपदेच्या उत्सवासाठी आपल्या हातातील सूर्यमणी आणि पादुका त्यांच्याकडे सुपूर्त केल्या.या दोन्ही अक्कलकोटच्या संस्थानिकांनी मोठ्या श्रद्धेने देवघरात जपून ठेवल्या आहेत.
सामान्य भक्तांनाही त्याचे दर्शन व्हावे, या हेतूने भोसले कुटुंबीयांनी त्यांच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भाविक मोठ्या संखेत दर्शनासाठी आले आहेत.
स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामींच्या सूर्यमणी आणि त्यांच्या पादुकांच दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.