Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Divorce : ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐश्वर्याने सोशल मीडियावर वडिलांच्या जयंतीनिमित्त काही फोटो शेअर केले होते. ऐश्वर्याने तिची लेक आराध्यासोबतचेही फोटो शेअर केले होते. पण यात अभिषेक बच्चन कुठेही दिसला नाही.
ऐश्वर्याने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं,तुमच्यावर प्रेम करते. प्रचंड गोड आजोबा... प्रेमळ, दयाळू, तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही..वाढदिवसाच्या शुभेच्छा..तुमची नेहमीच आठवण येत राहते.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिषेकसोबतचा फोटो का शेअर केला नाहीस? असा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप ऐश्वर्या किंवा अभिषेकने काहीही उत्तर दिलेलं नाही.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 साली लग्नबंधनात अडकले.
काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये बिनसलं असल्याची चर्चा याआधीदेखील झाली आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत.
ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.