Aditya Roy Kapur : 10 वर्षांपासून एकही हिट नाही, तरीही स्टारडम कायम; कोट्यवधीचे मानधन घेतो 'हा' अभिनेता
हा अभिनेता म्हणजे आदित्य रॉय कपूर आहे. आदित्यने मागील वर्षांपासून हिट चित्रपटात काम केले नाही. मात्र, त्याच्या स्टारडमवर कोणताही परिणाम झाला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य रॉय कपूरचे आजोबा रघुपत रॉय कपूर हे 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला एक चित्रपट निर्माते होते. त्याचा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर हा प्रसिद्ध निर्माता आहे. कुणाल रॉय कपूर हा देखील अभिनेता आहे. तिन्ही भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहे.
आदित्य रॉय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात चॅनेल व्ही इंडियाचा व्हीजे म्हणून केली होती. त्याच्या कॉमिक टायमिंग आणि होस्टिंगच्या युनिक स्टाइलचे कौतुक करण्यात आले होते. सलमान खानच्या 'लंडन ड्रिम्स' चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.
त्यानंतर अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या अॅक्शन रिप्ले या चित्रपटात काम केले. हा चित्रपटही फ्लॉप झाला. हृतिक आणि ऐश्वर्याच्या गुजारिश चित्रपटात झळकला. मात्र, हा चित्रपटही फ्लॉप झाला.
2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 या चित्रपटाने आदित्यच्या करिअरला निर्णायक वळण दिले. श्रद्धा कपूरसोबत त्याने लीड रोल साकारला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आदित्य आणि श्रद्धा स्टार कलाकार झाले.
त्याच वर्षी आदित्य रॉय कपूरने रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.
त्यानंतर आदित्यने 'फितूर', 'दावत-ए-इश्क', 'ओके जानू', 'कलंक', 'सडक 2', 'गुमराह' आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, हे चित्रपट फारशी कमाई करू शकले नाहीत. नाईट मॅनेजर या वेब सीरिजमध्येही त्याने काम केले.
आदित्य रॉय कपूर हा प्रत्येक चित्रपटासाठी 7 कोटी रुपये मानधन घेतो. एका रिपोर्टनुसार, त्याची संपत्ती 89 कोटी रुपये आहे.
आदित्य आता लवकरच अनुराग बसूच्या 'मेट्रो...इन दिनो' या चित्रपटात सारा अली खान सोबत दिसणार आहे. या चित्रपटात नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल, आदी कलाकार आहेत.