Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
प्रीती झिंटा- बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रीती झिंटा अमेरिकन उद्योगपती जीन गुडइनफच्या प्रेमात पडली. प्रीतीच्या पतीची एकूण संपत्ती 110 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रीती आणि जीन सरोगसीद्वारे मुलगी जिया आणि मुलगा जय यांचे पालक झाले. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनम कपूर- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. या दोघांनी 2018 साली लग्न केले. आनंद हा खूप श्रीमंत बिझनेसमन आहे. त्यांची एकूण संपत्ती 4 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
दिया मिर्झा- 2019 मध्ये साहिल संघाशी घटस्फोट घेतल्यानंतर, दिया मिर्झाने 2021 मध्ये वैभव रेखीशी लग्न केले. आर्थिक गुंतवणूकदार म्हणून वैभवची ओळख आहे.
जुही चावला- 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला देखील एका बिझनेसमनच्या प्रेमात पडली होती. जुहीचा पती जय मेहता हे एक उद्योजक आहेत. 1995 मध्ये जुहीशी ते विवाहबद्ध झाले. जय हे 'द मेहता ग्रुप'चे अध्यक्ष आहे. या कंपनीचे व्हॅल्यूएशन हे 4 हजार कोटींहून अधिक आहे. तो आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक आहे.
राणी मुखर्जी- सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. आदित्य बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. 'डीएनए'च्या वृत्तानुसार त्यांची एकूण संपत्ती 7200 कोटींहून अधिक आहे.
शिल्पा शेट्टी- या यादीत शिल्पा शेट्टीचेही नाव आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जवळपास 2800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. शिल्पा आणि राज यांचे लग्न 2009 मध्ये झाले होते.
विद्या बालन-आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री विद्या बालनने 2012 मध्ये प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. 'रिपब्लिक वर्ल्ड'च्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थची एकूण संपत्ती 37 कोटींच्या घरात आहे.