Written By : abp majha web team | Updated at : 18 Mar 2022 10:59 AM (IST)
(photo:sunnyleone/ig)
1/6
सनी लिओनी आमदार निवासात! चक्रावलात ना? पण ही बातमी अगदी खरी आहे. सनी लिओनी आमदार निवास या मराठी चित्रपट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. (photo:sunnyleone/ig)
2/6
आमदार निवास या चित्रपटातील शांताबाई या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी आमदार निवासात दिसली होती, त्यावेळी चर्चेला उधाण आले होते. (photo:sunnyleone/ig)
3/6
अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता सनी लिओनीने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. (photo:sunnyleone/ig)
4/6
तेलगू ,तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. (photo:sunnyleone/ig)
5/6
आमदार निवास या चित्रपाटात आयटॉम साँग करताना सनी लिओनी दिसणार आहे. दरम्यान, यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. (photo:sunnyleone/ig)
6/6
लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार सुरु आहे. आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत. (photo:sunnyleone/ig)