Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (photo:sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही आनंदाची बातमी शेअर करताना सोनमने पती आनंद आहुजासोबतचे (Anand Ahuja) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनमने प्रेग्नेंसीची घोषणाही केली आहे. (photo:sonamkapoor/ig)
हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले की, ‘चार हात, जे तुझी जमेल तितकी काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या सोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला प्रेम आणि पाठींबा देईल. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.’ (photo:sonamkapoor/ig)
सोनमच्या या फोटोंवर बॉलिवूड स्टार्सच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. भूमी पेडणेकरने या जोडप्याला हार्ट इमोजी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. एकता कपूर, जान्हवी कपूर, करीना कपूर, रवीना टंडन, करिश्मा कपूर यांनी सोनमच्या फोटोवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. (photo:sonamkapoor/ig)
बेबी बंपसोबत अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती आनंदसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये सोनमने काळ्या रंगाचा आऊटफिट घातला असून, बेबी बंपवर तिचा हात ठेवला आहे. याआधीही सोनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा असल्याचे म्हटले होते. (photo:sonamkapoor/ig)
सोनम तिच्या वैवाहिक जीवनातही खूप आनंदी आहे. अभिनेत्री अनेकदा पती आनंद आहुजासोबत तिचे फोटो शेअर करत असते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनम कपूरने 'सावरिया' या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. (photo:sonamkapoor/ig)
लग्नानंतर अभिनेत्रीने मनोरंजनविश्वापासून अंतर राखले आहे. (photo:sonamkapoor/ig)