In Pics : ‘तुझ्या कातील अदा...’, शनाया कपूरच्या ग्लॅमरस अवतारावर चाहते फिदा!
संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने पदार्पणापूर्वीच तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. इंस्टाग्राम प्रोफाईल सार्वजनिक केल्यापासून शनाया चर्चेत आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडिया यूजर्समध्ये शनायाची स्टाईल नेहमीच सुपरहिट ठरते. अलीकडेच शनायाने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनाया टेरेसवर पोज देताना दिसत आहे. हाय थाय स्लिट ग्रीन ड्रेसमध्ये शनाया जबरदस्त आणि ग्लॅमरस दिसत आहे.
मोकळ्या केसांमुळे तिच्या लुकमध्ये आणखी भर पडली आहे. कॅमेऱ्यासाठी पोज देताना शनाया कपूर तिचे केस आणि मेकअप फ्लाँट करताना दिसत आहे. दुसरीकडे, शनायाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी स्ट्रॅप-ऑन हील्स देखील परिधान केली होती. शनायाच्या या फोटोवर तिच्या मैत्रिणी सुहाना खान, अनन्या पांडे आणि खुशी कपूर यांनीही कमेंट केल्या आहेत.
सध्या शनाया कपूर तिच्या डेब्यू चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत लक्ष्य ललवानी आणि गुरफतेह पिरजादा हे दोन कलाकार दिसणार आहेत.
अलीकडेच, शनाया कपूरला या दोघांसोबत अपूर्व मेहताच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट करण्यात आले होते. त्या सुंदर संध्याकाळसाठी स्टार किडने संपूर्ण पांढरा कॅरी केला होता.
या लूकमधील फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शशांक खेतान शनायाचा पहिला चित्रपट ‘बेधडक’ दिग्दर्शित करत आहे. (Photo : @shanayakapoor02/IG)