In Pics : 'एक चुटकी सिंदूर की किमत...'; पाहा बॉलिवूड अभिनेत्रीचा साजश्रृंगार
एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू… असं कोणी म्हटलं की ती व्यक्ती किती फिल्मी आहे, अशीच प्रतिक्रिया अनेकजण देतात. पण, तुम्हाला माहितीये का हाच सिंदूर बी- टाऊन अभिनेत्रींच्या सौंदर्यात आवर अनेकदा 'चार चाँद' लावून गेला आहे. चला तर मग पाहूया, बॉलिवूड अभिनेत्रींचा असाच साजेसा साजश्रृंगार आणि त्यांचा सिंदूर लूक.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं तिच्या विवाहसोहळ्यातील एका लूकसाठी सिंदूर निवडला होता.
करीना कपूर खान हिनंही अनेकदा सिंदूरला पसंती दिली आहे.
अभिनेत्री बिपाशा बासू ही विवाहसोहळ्याच्या वेळी नववधूच्या रुपात दिसली. त्यावेळी तिनं सिंदूरला प्राधान्य दिलंच होतं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सणावाराला किंवा काही खास क्षणांना अशाच लूकमध्ये दिसते.
सोनम कपूर हिनं स्टाईल स्टेटमेंट कायम ठेवत सिंदूरनं अनेकदा आपला लूक पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं आहे.
विद्या बालन ही अनेकदा पारंपरिक वेशभूषेत दिसून आली आहे. तिनंही अनेकदा सिंदूर लावत लूक परिपूर्ण केला आहे.
अनुष्का शर्मानंही लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात असाच लूक केला होता.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही विवाहबंधनात अडकल्यानंतर माध्यमांसमोर आली, तेव्हा तिनं लावलेला सिंदूर, कुंकू अनेकांचं लक्ष वेधून गेलं.
ऐश्वर्या राय बच्चन हिनं अनेकदा अशा प्रकारच्या लूकला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं आहे. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)