Spotted | मोकळे केस अन् क्लासी अदा, चाहते झाले मलायकावर फिदा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या गर्ल गँगसोबत पार्टी करण्यासाठी आपली बहिण अमृता अरोराच्या घरी पोहोचली. यादरम्यान, ती पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यादरम्यानचे मलायकाचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलायका अरोरा यादरम्यान, अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान मलायका अरोरा ऑल व्हाइट लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
मलायका पॅपाराजींच्या समोर आपल्या मोकळ्या केसांसोबत लूक देताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
ओव्हरसाइज व्हाइट शर्टमध्ये मलायकाचा हा कूल अंदाज फॅन्सला खूपच आवडला असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
फोटो पाहून असं वाटतंय की, मलायकासाठी वय जणू थांबलंच आहे, कारण वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही बॉलिवूडची मुन्नी अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
मलायका फिटनेसच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींनाही मागे टाकते. ती बऱ्याचदा सोशल मीडियावर आपले स्टनिंग फोटो शेअर करत असते. (Photo Credit: Manav Manglani)
आपल्या स्टाइल आणि फॅशनसाठी ओळखल जाणारी मलायका अरोराचा समावेश फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींच्या यादीतही आवर्जुन केला जातो. (Photo Credit: Manav Manglani)
मलायका फिटनेसचं रहस्य म्हणजे, तिचं फिटनेस रुटिन. एक्सरसाइज आणि योगा यांचा समावेश तिच्या रूटिमध्ये आवर्जुन केला जातो. (Photo Credit: Manav Manglani)
फिटनेससोबतच आपल्या लव्ह लाइफमुळेही मलायका चर्चेत असते. (Photo Credit: Manav Manglani)
अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे. (Photo Credit: Manav Manglani)