Actress Live In Relationship After Divorce : 'या' अभिनेत्री घटस्फोटानंतर बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये; कुणी लग्न केलं तर कोण लग्नाशिवाय प्रेग्नेंट
पतीपासून विभक्त झाल्यानंतर काही अभिनेत्री खचल्या आहेत. तर काहींनी मात्र नव्या नात्याची सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर मलायका आता तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे.
अभिनेत्री पूजा बजाने सर्जन सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं होतं. पण त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. रिपोर्ट्नुसार, पूजा आणि नवाब शाह सध्या लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे.
रश्मि देसाई 2012 साली नंदीश सिंह संधूसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण बिग बॉसमध्ये रश्मि आणि अरहानची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली.
काम्या पंजाबी बंटी नेगीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाच्या दहा वर्षांनी 2013 साली ते विभक्त झाले. त्यानंतर काम्याने उद्योगपती शलभ डांगसोबत लग्न केलं.
कल्कि केकला सिनेनिर्माता अनुराग कश्यपसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण लग्नानंतर लगेचच ते वेगळे झाले. सध्या कल्कि आणि गाय हर्षबर्ग रिलेशनमध्ये आहेत.
अभिनेत्री दीया मिर्जा साहिल सांघासोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर दीयाने वैभव रेखीसोबत लग्न केलं.