PHOTO : फॅशनच्या बाबतीत जान्हवीलाही तगडी टक्कर देतेय बहीण खुशी कपूर, नवे फोटो पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुशी कपूर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यांना सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळते.
दरम्यान, खुशीने एक नवे फोटोशूट शेअर केले आहे. तिचे हे लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खुशी कपूर इन्स्टावर प्रचंड अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच खुशी कपूरने त्रिकोणी झिग झॅग कटचा बॉडी हगिंग कट आऊट ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
खुशी कपूरचे हे मनमोहक फोटोशूट काही वेळातच व्हायरल झाले आहे.
खुशी कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. खुशी झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही बॉलिवूड पदार्पण करणार आहे. (फोटो : @Khushi Kapoor/IG)