जुही चावलाच्या प्रशस्त आणि स्वप्नवत घराची House Tour
हिंदी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री जूही चावला ही मागील बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरीही तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. रुपेरी पडद्यापासून दूर असणारी जुही तिच्या खासगी आयुष्यात चांगलीच रमली आहे. ती आपल्या कुटुंबासह मुंबईत एका आलिशान घरात राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(सर्व छायाचित्रं- जुही चावला/ इन्स्टाग्राम)
या घरात जुही आणि तिचं कुटुंब दोन मजल्यांच्या भागात राहतं. तर, एका मजल्यावर जय मेहता यांच्या काकांचं कुटुंब राहतं.
आऊटडोअर सिटींगची व्यवस्था असल्यामुळं या घराला एक परिपूर्ण लूक मिळत आहे.
घराच्या छतावरून संपूर्ण मरिन ड्राईव्ह परिसर दिसतो. शिवाय इथे असणारा डायनिंग टेबल या भागाला चार चाँद लावून जातो.
घरामध्ये असणाऱ्या काही खांबांवर नक्षीकाम करण्यात आल्यामुळं एका महालाचा लूकही येथे पाहायला मिळतो.
सूत्रांच्या माहितीनुसार या पाच मजली घराची खरेदी जय मेहता यांच्या आजोबांनी 1940 मध्ये केली होती.
संगमरवराच्या वापरापासून ते अगदी इंटेरियरपर्यंत प्रत्येक गोष्ट तितकीच साजेशी आहे.
मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीमध्ये जुही आणि तिचे पती जय मेहता यांचं आलिशान आणि प्रशस्त घर आहे. बाहेरून सुरेख दिसणाऱ्या या घराचे अंतरंगही तितकेच लक्षवेधी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -