अनिता भाभी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस; सोशल मीडियावरील Stunning Looks पहा
सौम्या टंडन देखील एका मुलाची आई आहे. सौम्याने आपल्या मुलाचे नाव मिरान टंडन सिंग ठेवले आहे, ज्याचा अर्थ सम्राटांचा सम्राट आहे. (Pic credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. (Pic credit: Instagram)
सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (Pic credit: Instagram)
गेल्या वर्षभरापासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. बातमीनुसार सौम्य कोरोना काळात शूटिंग होत असल्याने ती नाराज होती. यामुळे तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला. (Pic credit: Instagram)
'भाभी जी घर पर है'मध्ये अनीता भाभी अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे) पेक्षाही हुशार आणि सुशिक्षित असल्याचे पाहायला मिळाले आहे. जी प्रत्येक अडचण चुटकीसरशी सोडवण्याचा प्रयत्न करते. (Pic credit: Instagram)
शोमध्ये अनीता भाभी बनलेल्या सौम्या टंडनला प्रभावित करण्यासाठी नेहमीच तिचा नवरा विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन तिवारी (रोहताश्व गौर) यांच्यात कॉमिक अंदाजात भांडण होत असते. (Pic credit: Instagram)
'भाभीजी घर पर है' मध्ये असे दाखवलंय की की अनिता भाभीच्या सौंदर्याची संपूर्ण भागात चर्चा असते. तिचा शेजारी मनमोहन तिवारी (रोहताश्वा गौर) अनेकदा तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. (Pic credit: Instagram)
टेलिव्हिजन जगातील सर्वात प्रसिद्ध विनोदी मालिकांपैकी एक, ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabhiji Ghar Par Hain) मधील गोरी मॅम अर्थात अनिता भाभीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली सौम्या टंडन आता या शोला निरोप देत आहे. शोमध्ये सौम्याच्या जागी नवीन भाभी नेहा पेंडसे आली आहे. शोमध्ये सौम्या टंडनने शिक्षित आधुनिक गृहिणी 'अनिता भाभी'ची भूमिका साकारली होती, तर विभूती नारायण तिवारी (आसिफ शेख) बेरोजगार असलेल्या तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. (Pic credit: Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -