काय सांगता, एलियाना डिक्रुझ पुन्हा प्रेग्नेंट? व्हिडीओत मिळाली अशी हिंट की वेगवेगळ्या चर्चांना उधाण

Ileana DCruz Second Pregnancy: बॉलिवुडमधील दिग्गज सेलिब्रिटी नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. काही स्टार्सने आपल्या वर्षभराचा प्रवास कसा राहिला हे सांगण्यासाठी काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री एलियान डिक्रुझनेही इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने आपल्या या व्हिडीओमध्ये वर्षभरात काय, काय केलं, हे सांगितलं आहे.

याच व्हिडीओमध्ये तिने गेल्या वर्षाच्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील तिच्यासोबत काय काय घडलं हे सांगितलं आहे. याच व्हिडीओमध्ये अक्टुबर महिन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कारण याच ऑक्टोबर महिन्यात एलियाना डिक्रुझ प्रेग्नेन्सी टेस्ट किट कॅमेऱ्यासमोर दाखवताना दिसत आहे.
सोबतच तिने 2025 हे वर्ष आणखी आनंददायी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र एलियाना डिक्रुझचा ऑक्टोबर महिन्यातील व्हिडीओ पाहून अनेकज ती पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याचा दावा करत आहेत.
विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रावर कमेंट बॉक्समध्ये तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तू पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहेस का असं विचारलंय.
एलियानाने मायक डोलन याच्यासोबत लग्न केलेले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना पहिले अपत्य झाले. त्याचे नाव त्यांनी कोआ असे ठेले आहे. त्यानंतर आता एलियाना पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
एलियाना डिक्रुझ पहिल्यांदा प्रेग्नेंट असताना तिने हे फोटो अपलोड केले होते.
एलियाना डिक्रुझच्या व्हिडीओतील हीच क्लिप पाहून ती पुन्हा एकदा प्रग्नेंट आहे का? असे विचारले जात आहे.