काजोल नाही तर मर्सिडीज ठेवायचं होतं नाव, वाचा काजोलच्या नावाचा किस्सा
प्रत्येकाला सुपरस्टार्स आणि त्यांच्या आवडत्या ताऱ्यांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे असते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा देखील या यादीत समावेश आहे. काजोलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. काजोलविषयी जाणून घेण्यात त्यांना नेहमीच रस असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जो तिच्या नावाशी संबंधित आहे. तुम्हाला माहिती आहे का काजोलच्या वडिलांना तिचे नाव मर्सिडीज ठेवायचे होते. होय, आपण बरोबर वाचलं.. आम्ही मर्सिडीजच बोलत आहोत.
मर्सिडीजच्या मालकाने आपल्या कंपनीचे नाव त्याच्या मुलीचे नावावर ठेवले होते. म्हणजेच या कंपनीच्या मालकाच्या मुलीचे नाव मर्सिडीज होते. ज्यामुळे काजोलचे वडील शोमु मुखर्जी खूप प्रभावित झाले होते आणि म्हणूनच त्यांना आपल्या मुलीचे नाव मर्सिडीज ठेवण्याची इच्छा होती.
मात्र, हे नाव कसे तरी रद्द झाले आणि नंतर काजल असे नाव देण्यात आले. त्याचवेळी, ओ शब्द बंगाली भाषेत अधिक वापरला जात असल्याने, काजलचं काजोल झालं आणि आज संपूर्ण जग तिला या नावाने ओळखत आहे.
काजोलच्या नावाशी संबंधित ही कहाणी फार कमी लोकांना माहित आहे. एकदा एका गप्पांच्या कार्यक्रमात काजोलने ही कहाणी सर्वांना सांगितली. काजोल बंगाली आहे आणि तिचे आडनाव मुखर्जी आहे.
काजोल तिचे आडनाव चित्रपटांमध्ये वापरत नाही आणि ती केवळ काजोल म्हणून ओळखली जाते.