'या' कारणामुळे मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं तुटलं
संग्रहित छायाचित्र
1/6
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लव्ह मॅरेज केले होते. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. मात्र, असे असूनही लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांचे हे नातं तुटले. या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
2/6
पण, हे नातं तुटण्यामागे कारण काय होते? आजही लोक हे प्रश्न विचारत आहेत. यामागे बरीच कारणेही सांगितली जातात. मात्र, खरं कारण मलायकाने एका मुलाखतीच्या वेळी सांगितलं होतं.
3/6
घटस्फोटानंतर प्रथमच मलायका अरोरा यावर उघडपणे बोलली. जेव्हा दोन लोकं एकमेकांसोबत खुश नसतात तेव्हा वेगळे होणं चांगलं आहे. दोघेही या नात्यात आनंदी नव्हते. याचा परिणाम त्यांच्या जवळच्या लोकांवरही होत असल्याचे तिने कबूल केले.
4/6
अरबाज खानसोबत नात्याचा शेवट झाल्यापासून मलायकाचे नाव अर्जुन कपूरशी जोडले जात आहे. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून बर्याचदा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येतात.
5/6
दुसरीकडे अरबाज खानचे नाव परदेशी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशीही जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहेत.
6/6
विशेष म्हणजे मलायका आणि अरबाज वेगळे झाले असले तरी आजही दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम आहे. त्यांचा मुलगा अरहानचे पालक असल्याने त्यांनी एकमेकांशी समजूतदारपणाचे नाते स्थापित केले आहे.
Published at : 11 Apr 2021 06:22 PM (IST)