विराट कोहलीशी लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती? नाव ऐकलंत तर चक्रावून जाल...
11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केलं. 2024 मध्ये या जोडप्याच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली. या जोडप्याला दोन मुलं आहेत, एक मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. पण, तुम्हाला माहितीय का? विराट कोहलीसोबच आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असलेली अनुष्का शर्मा, आधी दुसऱ्या भारतीय क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा पसरली होती, त्यानंतर ती विराट कोहलीच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड आणि क्रीडा जगत, हा फार जुना संबंध. अनेक बी-टाऊन अभिनेत्रींनी प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी लग्न केलं आहे. या यादीत शर्मिला टागोरपासून अनुष्का शर्मापर्यंत सर्वांचा समावेश आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर त्यांनी लग्न करुन संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये येण्यापूर्वी त्यांची नावं इतर काही सेलिब्रिटींसोबत जोडली गेली होती.
BollywoodShaadi.com मधील एका वृत्तानुसार, विराट कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अनुष्का शर्माचं नाव प्रसिद्ध क्रिकेटर सुरेश रैनासोबत जोडलं गेलं होतं.
जेव्हा सुरेश रैना 'आप की अदालत'मध्ये आला होता, तेव्हा त्याला अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या कथित प्रेमसंबंधाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. हे ऐकताच सुरेश रैना गालातल्या गालात हसला होता. पण पुढे बोलताना त्यानं असं काहीही नव्हतं असं सांगितलं. पण त्याआधी त्याच्या चेहऱ्यावर जे हसू होतं, त्यामुळे पुन्हा अफवांना उधाण आलं होतं.
अफवा पसरल्यानंतर, काही लोकांनी असा अंदाज लावला की, रैना अनुष्काशी लग्न करू शकतो. दरम्यान, दोघांनीही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.
नंतर 2017 मध्ये, अनुष्का आणि विराटनं इटलीमध्ये आपली लग्नगाठ बांधली.
प्रसिद्ध होस्ट सिमी गरेवालसोबतच्या अनुष्काच्या जुन्या मुलाखतीत, तिनं लग्नाप्रती असलेल्या तिच्या वचनबद्धतेबद्दल सांगितलं होतं. तिनं लग्नाच्या पावित्र्यावर विश्वास आणि कामापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अनुष्का आणि विराट एकमेकांच्या साथीनं सुखी संसाराचा गाडा हाकत आहेत. अनुष्का शर्माला एक मुलगी वामिका आणि एक मुलगा अकाय आहे.
अलीकडेच, अनुष्का तिचा पती विराट कोहली आणि दोन्ही मुलांसह वृंदावनमध्ये प्रेमानंद जी महाराजांना भेटली आणि म्हणाली की, तिला फक्त भक्ती हवी आहे. अनुष्का सध्या बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे.