Popular Actors Died at 40 : वयाच्या चाळीशीमध्ये 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप! दिग्गज कलाकारांचाही समावेश
अभिनेत्री मीना कुमारी हिचे 1972 मध्ये निधन झाले. यकृताचा गंभीर आजार झाल्याने मीना कुमारी यांचे अकाली निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ आजही कायम असणारी अभिनेत्री मधुबाला यांचे 1969 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. मधुबाला निधना आधीच्या काही वर्षे आजारी होत्या. त्यांचा मृत्यू कॅन्सरने झाला असल्याचे सांगण्यात येते.
अभिनेत्री जिया खान हिने 2013 मध्ये आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 25 व्या वर्षी तिने आत्महत्या केली.
वर्ष 2016 मध्ये अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने वयाच्या 24 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्रत्युषाने आत्महत्या केली होती.
अभिनेता गुरु दत्त यांचे 1964 साली वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार, गुरु दत्त यांनी आत्महत्या केली होती. गुरुदत्त हे त्या काळातील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक होते.
अभिनेत्री दिव्या भारतीचे 1993 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले. दिव्याचा मृत्यू बाल्कनीतून पडल्यामुळे झाला असून, हा अपघात असल्याचे सांगण्यात आले.
सुशांत सिंग राजपूतचे 2020 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाला. पण काही राजकीय पक्ष आणि त्याच्या चाहत्यांनी याबाबत शंका उपस्थित केली. त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला. सीबीआयने अद्याप अंतिम अहवाल सादर केलेला नाही, त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे अद्याप समोर आलेले नाही.
अभिनेत्री स्मिता पाटील यांचे 1986 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले. पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी स्मिताचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला.