कधीकाळी झगडला, मेहनत घेतली, आता 'या' अभिनेत्याने फक्त कपडे ठेवण्यासाठी घेतलं आलिशान 3 बीएचके घर!
Krushna Abhishek House: प्रसिद्ध विनोदवीर कृष्णा अभिषेक याला संपूर्ण भारतभर ओळखलं जातं. त्यानं स्वत:च्या हिमतीवर बॉलिवुड तसेच सिनेक्षेत्रात आपलं नाव कमवलं आहे. विनोदबुद्धीमुळे कृष्णाचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. दरम्यान, करिअरच्या सुरुवातीला अत्यंत कठीण काळातून गेलेल्या कृष्णा अभिषेकचे दिवस सध्या बदलले आहेत. आता फक्त बुट आणि कपडे ठेवायला त्याने वेगळे घर खरेदी केले आहे. याबाबत त्याने नुकतीच माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृष्णा अभिषेकने त्याचे फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी तब्बल तीन बेडरुम असलेलं घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे तो या कपड्यांचं आणि बुटांचं कलेक्शन प्रत्येक सहा महिन्यांनी बदलतो. त्याने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.
कृष्णा अभिषेकला वेगवेगळे कपडे आणि मोठ्या ब्रँडचे शूज खरेदी करायला आवडते. त्यामुळेच त्याने हा 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटमध्ये तो फक्त कपडे आणि शूज ठेवतो.
कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. मात्र गोविंदाचा भाचा असला तरी कृष्णाची वेगळी अशी ओळख आहे. तो नुकतेच अर्चना पूरण सिंह हिच्या यूट्यूब चॅनेलवर मुलाखत देण्यासाठी आला होता. या मुलाखतीत त्याने आपल्या या घराबद्दल सांगितले आहे.
अर्चना पूरण सिंह यांच्यासोबत गप्पा करताना कृष्णा अभिषेकने त्याच्या कपड्यांबद्दल तसेच शूजवरील प्रेमाबद्दल सांगितले. सध्या कृष्णाकडे खूप सारे कपडे आणि शूज झाले आहेत. हे सर्व ब्रँडेड कपडे आणि शूज ठेवण्यासाठी त्याला वेगळे घर खरेदी करावे लागल्याचे त्याने सांगितले.
कृष्णा अभिषेकने ही माहिती देताच अर्चना पूरण सिंह चांगलीच चकित झाल्याचं या मुलाखतीत दिसतंय. याच मुलाखतीत बोलताना मी लहाणपणी गोविंदा यांचे कपडे परिधान करायचो, असे कृष्णाने सांगितले.
कृष्णा अभिषेक